‘दुनियादारी’च्या ‘तारुण्य’ यशानंतर दिग्दर्शक संजय जाधव याच्या पुढील चित्रपटाबाबत विशेष उत्सुकता असणे अगदी स्वाभाविक आहे.

‘दुनियादारी’च्या ‘तारुण्य’ यशानंतर दिग्दर्शक संजय जाधव याच्या पुढील चित्रपटाबाबत विशेष उत्सुकता असणे अगदी स्वाभाविक आहे. तो चित्रपट आहे, ‘प्यारवाली ल्व्हस्टोरी’. हिंदू नायक (स्वप्नील जोशी) आणि मुस्लिम नायिका (सई ताह्मणकर) यांची प्रेमकथा त्यात आहे. कथा संजय जाधव यांचीच आहे, तर पटकथा अरविंद जगताप यांची असून तपन भट्ट आणि आशिश पाथरे सहलेखक आहेत.
या चित्रपटाच्या गाण्याची ध्वनिफित विक्रम भट्टच्या हस्ते आणि सचिन पिळगावकरच्या उपस्थितीत नुकतीच प्रकाशित झाली. ‘दुनियादारी’च्या यशात त्यातील गीत-संगीत आणि त्याचे रुपेरी सादरीकरण याचा महत्वाचा वाटा होता. त्यामुळे ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ या चित्रपटातील गीत-संगीताबाबत विशेष उत्सुकता असणारच. चित्रपटाची गीते गुरू ठाकूर, मंदार चोळकर, सचिन पाठक आणि वैभव जोशी यांची असून त्याना पंकज पडघन, समीर साप्तीसकर यांचे संगीत आहे. नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव याचे आहे. गाण्यांचे सादरिकरण दिमाखदार आहे. विशेषत: सई ताह्मणकरला ‘सूर’ अगदी छानच सापडला आहे. बऱ्याच वर्षानी मराठी चित्रपटात कव्वाली गीत पाहायला मिळेल, हे विशेष. गाण्याच्या चालीरिती पाहता प्रेम आणि सर्वधर्मसमभाव या मार्गाने जाणारा हा चित्रपट दिसतो. गुणवत्ता आणि यशाच्या बाबतीत तो ‘दुनियादारी’च्या मार्गाने जातो का हे पाहण्यासाठी दिवाळीपर्यंत थांबायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *